Breaking News

पनवेलच्या मिहीर परदेशीला सुवर्णपदक

आशिया बॅडमिंटन स्पर्धेतील यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ऑल स्पोर्ट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ओपन इंटरनॅशनल गेम्स 2021 बॅडमिंटन स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयाचा विद्यार्थी मिहीर मदन परदेशी याने बॅडमिंटन पुरुष खुल्या एकेरी गटातील स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मिहीरचा सत्कार करण्यात आला.  
नेपाळ येथील शान बँक्वेटमध्ये बॅडमिंटन आशिया स्पर्धेत 20 वर्षीय मिहीर परदेशीने सरस कामगिरी करीत सुवर्णपदक पटकाविले. मिहीर सीकेटी हा महाविद्यालयाचा टीवाय बीकॉमचा विद्यार्थी आहे. शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य एस. के. पाटील, क्रीडा शिक्षक विनोद नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मिहीरचे अभिनंदन केले.

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply