Tuesday , February 7 2023

पेण खारेपाट विभागात तीन दिवसाआड पाणीपुरवठा

पेण : प्रतिनिधी

जून महिन्यापासून पेण तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. तालुक्यातील हेटवणे धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. मात्र पेणच्या खारेपाटाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने तेथील ग्रामस्थांना पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने हेटवणे धरणही तुडुंब भरले आहे. हेटवणे धरणातील पाणी शहापाडा धरणात येऊन त्यानंतर ते खारेपाट भागात वितरीत केले जाते. खारेपाटाच्या पाण्यासाठी सरकारकडून निधी आला; मात्र निष्क्रिय अधिकार्‍यांमुळे जलवाहिनीचे काम रखडले आहे. त्यामुळे पेण तालुक्यातील वाशी, वडखळ भागासह खारेपाटातील ग्रामस्थ आजही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

पेण खारेपाटातील 40 गावे 36 वाड्यांना पाणी अधिक देण्यासंदर्भातचे नियोजन सुरू आहे. हेटवणे धरणातील पाणी जास्त प्रमाणात मिळाले तर एक दिवसआड या भागाला पाणी देता येईल. तेथून येणारे पाणी कमी प्रमाणात असल्याने ही अवस्था आहे. याबाबत सर्व अधिकार्‍यांची बैठक प्रांताधिकारी कार्यालयात होणार आहे. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

-संजय वेंगुर्लेकर, अधिकारी, पाणीपुरवठा विभाग पेण

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply