नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणाले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता अधिवेशन बोलवू नये असे सर्वसाधारण मत पुढे आले होते. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता हिवाळ्याचे महिने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता थेट अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत बोलावण्यात येईल.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …