Breaking News

चालू बिले न भरलेल्या ग्राहकांच्या जोडण्या कापल्या; श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप

श्रीवर्धन : प्रतिनिधी

चालू महिन्याची बिले न भरलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्या कापण्याची कारवाई महावितरणच्या श्रीवर्धन कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे येथील वीजग्राहक महावितरण विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. श्रीवर्धनमधील ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी देयके मिळतात. महावितरणकडून बिले वितरण करण्यास विलंब होत असल्याने बिल वेळेवर भरता येत नाही, असे येथील वीजग्राहकांचे म्हणणे आहे. वास्तविक वीज देयक भरण्याच्या अंतिम मुदतीनंतर जे ग्राहक बिले भरतात त्यांच्याकडून महावितरण 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत सरचार्ज वसूल करत असते, असे असतानादेखील चालू महिन्याची बिले न भरलेल्या ग्राहकांच्या वीज जोडण्या कापण्याचा सपाटा महावितरणने लावला असल्याचे श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यांची बिले पाचशे ते हजार रुपयांच्या सरासरीमध्ये असतात, अशा ग्राहकांच्यादेखील वीज जोडण्या कापण्यात आल्या आहेत. महावितरणच्या या दंडेलशाही कारभाराविरोधात ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Check Also

नवीन पनवेलमधून आमदार प्रशांत ठाकूर यांना मताधिक्य देणार -संदीप पाटील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलचा विकास करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना नवीन पनवेलमधून मताधिक्य देऊन …

Leave a Reply