Monday , January 30 2023
Breaking News

शौर्य दिनानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने शौर्य दिनानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत कोरोना महामारीच्या काळात आपले मदतकार्य सुरू ठेवत कौतुकास्पद कामगिरी करणार्‍या आजी-माजी सैनिक, पोलीस आधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार सोहळा बुधवारी आयोजित करण्यात आला होता. हा सत्कार सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सीडब्लूएच्या सेक्टर हेड रितू दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

पाकिस्तानने भारताच्या उरी या लष्करी केंद्रावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने 28 सप्टेंबर 2016च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यात भारतात घुसखोरीस सज्ज असलेले अनेक दहशतवादी ठार झाले. हा दिवस देशभरात शौर्यदिन म्हणून साजरा केला जातो. त्याअंतर्गत या दिनाचे औचित्य साधत 2017 पासून जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी शहीद माता पिता आणि पत्नीसांठी आणि त्यांच्या परिवारासठी विविध समाजिक उपक्रम राबविले जातात. त्याअंतर्गत फाऊंडेशनाच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू ठेवणारे आजी माजी सैनिक, सीआरपीएफ, मुंबई आणि नवी मुंबई पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला, तसेच वांगणी रेल्वेस्थानकात स्वतःच्या जीवाची बाजी लावत एका लहान मुलाचा जीव वाचवणारे मयूर शेळके, 50 आदिवासी मुलांना दत्तक घेणार्‍या मुंबई पोलीस दलाच्या महिला कर्मचारी रेहाना शेख आणि अलिबाग येथे प्रवासी वाहतूक बोटीच्या अपघातात 80 जणांचे प्राण वाचवणारे रायगड पोलीस दलातील प्रशांत घरत यांचा विशेष कौतुक म्हणून सन्मान करण्यात आला.

खारघर येथील लॅण्डमार्क बिल्डिंगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार सोहळ्यामध्ये सर्व सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रत आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला जय हिंद फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप माने, सचिव हनुमंत मांढरे, संस्थापकीय सदस्य वैशाली माने, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, अ‍ॅड. भाऊसाहेब जाधव, नामदेव मुंडे आदींसह पदधिकारी, आजी-माजी सैनिक, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply