Breaking News

बेकायदा गॅस सिलेंडरचा व्यवसाय करणार्यावर कारवाई

पनवेल : वार्ताहर

पनवेल तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीत असलेल्या एका धाब्याच्या परिसरात बेकायदेशीररीत्या टँकरद्वारे गॅस काढून तो सिलेंडरमध्ये भरून त्याची विक्री करणार्‍या चार जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून गॅस टँकर, मोटार सायकल, महिंद्रा कंपनीचा बोलरो या मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तालुक्यातील पोयंजे गावाच्या हद्दीतील मनोज ढाब्याच्या परिसरात अशा प्रकारे गॅस टँकर उभे करून त्याद्वारे गॅस काढून तो इतर सिलेंडरमध्ये बेकायदेशीररीत्या भरला जात असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून त्या ठिकाणी असलेले सोमराज विष्णोई (23), मांगीलाल विष्णोई (19), सुभाष पुनिया (24) व जलालउद्दीन अलीमउद्दीन खान (29) या चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून टँकर नं. एमएच 12 एलडी 5333, महिंद्रा बोलेरो जीप, हिरो कंपनीची मोटारसायकल, जुगाड मशीन, रेग्युलेटर व इतर साहित्य असा मिळून जवळपास 39 लाख 14 हजार 875 रुपये मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध भादंवी कलम 406, 285, 34 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955चे कलम 4, 7, 8 सह रेग्युलेशन ऑफ सप्लायर्स अ‍ॅण्ड डिस्टीब्युशन ऑर्डर 2000 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत अजूनही काही जणांचा समावेश असल्याने त्यांचा शोध तालुका पोलीस करीत आहेत.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply