Breaking News

कुंडी नदी परिसरात अडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

पनवेल : वार्ताहर

तालुक्यातील वाजेपूर गावातील कुंडी नदी परिसरात वर्षासहलीसाठी गेलेले काही पर्यटक अचानकपणे वाढलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अडकले होते. त्यांना सुखरूप स्थानिक ग्रामस्थ व तालुका पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा आनंद लुटण्यासाठी काहीजण त्या भागात पर्यटनासाठी गेले होते, परंतु अचानकपणे पाण्याचा लोंढा वाढल्याने ते अडकले गेले. या वेळी सलमान खान यांच्या अर्पिता फार्महाऊस येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तातडीने नेरे पोलीस बीट येथे कार्यरत असणारे एएसआय गोडसे यांना ही बाब कळवली. त्यांनी तत्काळ गावातील सामाजिक कार्यकर्ते नरेश पाटील यांना सांगून काही तरुणांना त्या ठिकाणी रस्सीसह पाठवण्यास सांगितले. ते सर्वजण त्या ठिकाणी पोहोचताच रस्सीच्या आधाराने त्या तरुणांनी अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. आपला जीव वाचवल्याबद्दल त्यांनी पनवेल तालुका पोलिसांसह नरेश पाटील व मदतीसाठी धाव घेणार्‍या तरुणांचे आभार मानले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply