पोलादपूर : प्रतिनिधी
शारदीय नवरात्रोत्सवामध्ये प्रतापगडाकडे जाणार्या देवीभक्तांसाठी एसटी बसच्या विशेष फेर्या सुरू झाल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली.
नवरात्रोत्सव काळात महाड आगारातून रोज सकाळी 7 आणि दुपारी 2 वाजता तर प्रतापगड येथून सकाळी 11.30 आणि सायंकाळी 5.30 वाजता बस सोडण्यात येतील. भाविकांनी याची नोंद घेऊन या एसटी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी भाविकांना केले आहे.