Breaking News

कोरोनामुळे रायगडात चौघांचा मृत्यू; 60 नवे रुग्ण

नवी मुंबईत पाच जण मृत्युमुखी; 79 व्यक्ती पॉझिटिव्ह

पनवेल, नवी मुंबई : कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 28) चार जणांचा मृत्यू झाला असून, 60 पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृतांमध्ये पनवेल तालुक्यातील खारघर, उसर्ली खुर्द व करंजाडे तसेच म्हसळा तालुक्यातील दुर्गवाडी येथील व्यक्तीचा समावेश आहे. याशिवाय पनवेल महापालिका हद्दीत 18, अलिबाग 11, कर्जत आठ, पोलादपूर सहा, पनवेल ग्रामीण, म्हसळा व उरण प्रत्येकी पाच, तर रोहा व श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 900 आणि मृतांची संख्या 41 झाली आहे. नवी मुंबईत कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आणि 79 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 1853 आणि बळी पडलेल्यांची संख्या 59 झाली आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply