कळंबोली : रामप्रहर वृत्त
मिशन कवच कुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहीम 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या प्रयत्नाने आणि महापालिकेच्या माध्यामातून शनिवारी (दि. 9) एक दिवसीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या लसीकरण शिबिरात नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या वेळी कळंबोली मंडल अध्यक्ष रवीशेठ पाटील व नगरसेविका प्रमिला पाटील, मंडल सरचिटणीस संजय दोडके, दिलीप बिस्ट, उत्तर भारतीय मंडल अध्यक्ष केशव यादव, मच्छींद्र कुंद्रुद, विलास किठे, महादेव पाटील, किरण घाडगे, महेश राठोड, राणी राणापूर, लैला चांद शेख, कविता गुजर, पुजा ठाकूर, मयुरी पेरवि, महिला मोर्चा सरचिटणीस दुर्गा साहनी, मोगल्या मोगला, पनवेल महानगरपालिकेच्या डॉ. अक्षय कोलेकर, डॉ. विद्या राऊत, डॉ. दुर्गा आहिरे, डॉ. सोनाली पडवळ, डॉ. सुवर्णा चव्हाण, डॉ. शितल शिंदे, डॉ. रुपाली नाचन, डॉ. मच्छींद्र कुरुंद आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.