Breaking News

सर्वेक्षणकामी गैरहजर कर्मचार्‍यांना आयुक्तांचा दणका; 500 रुपयांचा दंड

पनवेल ः प्रतिनिधी 

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी 500 रुपये दंड करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रकोप वाढत असताना कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील

सर्वेक्षण करणे आवश्यक ठरते. यासाठी महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेचे शाळांतील शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक केली होती. पनवेल मनपाचे सर्वच कर्मचारी मार्चपासून सतत काम करत आहेत. मात्र संसर्ग वाढल्याने व कर्मचारी कमी असल्याने शेवटी रा.जि.प.चे कर्मचारी सर्वेक्षणकामी घेण्यात आले. यातील बरेच कर्मचारी गैरहजर राहत असल्याने नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. यातील गैरहजर कर्मचार्‍यांना गुन्हे दाखल करण्यापूर्वी दंड करण्यात आला. भविष्यात कोणी गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. राजिप शाळांचे एकूण शिक्षक 323 आहेत. यापैकी 55 वर्षे वय, आजारपण व विविध कारणांमुळे 221 शिक्षक आले नाहीत. त्यांच्या रजा खर्ची टाकण्यात येत आहेत. उर्वरितपैकी 103 शिक्षक आले होते. 76 शिक्षक गैरहजर राहिले. त्यांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. पनवेल कार्यरत शिक्षक 12 गैरहजर 12, कळंबोली 26 कार्यरत शिक्षक 20 गैरहजर, नवीन पनवेल 34 कार्यरत शिक्षक 20 गैरहजर, खारघर 18 कार्यरत शिक्षक 14 गैरहजर, कामोठे 14 कार्यरत शिक्षक दोन गैरहजर अशी आकडेवारी आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply