पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असलेली टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोषने भारताकडून खेळताना ट्युनिशिया ओपनचे विजेतेपद पटकाविले आहे. स्वस्तिकाने 19 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात ही ‘सुवर्ण’ कामगिरी साकारली. याबद्दल संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचे अभिनंदन व कौतुक केले. या वेळी व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, स्वस्तिकाचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष आदी उपस्थित होते. यापूर्वीही स्वस्तिका घोषने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून पदके जिंकली आहेत. परदेशात प्रथमच तिने सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …