पाली : प्रतिनिधी
मृगगड किल्ला सुधागड तालुक्याच्या इतिहासाचा एक अभेद्य साक्षीदार आहे. हा मृगगड जपण्याचे काम दुर्गवीर प्रतिष्ठान मार्फत सातत्याने होत आहे. दुर्गवीर तर्फे येथे स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. त्यात महिला व मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. प्रशांत डिंगणकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत मृगगड किल्ल्यावरील पाण्याची टाकी, वास्तू व मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. या मोहीमेत शौर्य हसुरकर, गार्गी डिंगणकर, गौरी थोरा या मुलांसह उज्वला शिखरे, प्रियंका म्हात्रे, दिव्यता घाणेकर, प्रणिता उत्तेकर, कल्पना निवाते, संस्कृती हसुरकर, विनीता पनवेलकर, किरण नितीन पाटोळे, शीतल घुगारे, मंगल यादव आदी महिलाही सहभागी झाल्या होत्या.