Breaking News

रिक्षा संघटनेच्या नामफलकाचे अनावरण

उरण : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य उरण तालुक्यातील विंधणे बसस्टॉप येथे विंधणे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील गावातील युवावर्ग यांच्या जय शिवराय रिक्षा चालक-मालक संघटनेच्या नामफलकाचे अनावरण पनवेल येथील परिवहन अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विंधणे ग्रामपंचायतीच्या सरपंच निसर्गा डाकी, प्रसाद  उद्योजक नरेश पाटील, भगवान नवाळे, प्रमोद शेळके, रोशन डाकी, शक्ती म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी पाटील, मंगेश, घरत व इतर सदस्यांसमवेत सामाजिक कार्यकर्ते सुनिल जोशी, बालकृष्ण पाटील रघुनाथ घरत, संतोष पाटील, प्रमोद पाटील, राजाराम थळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेळके व संदीप  कडु, किरण घरत, शैलेश  कोळी, अविकार ठाकूर व सर्व सभासदांसह ग्रामस्थ व महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply