पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर गडब गावाच्या हद्दीत सोमवारी (दि. 22) सकाळी इको कारला मागून येणार्या डंपरने जोरदार धडक दिली. या वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पादचारी वाहनाची ठोकर बसून, तो जखमी झाला आहे.
सोमवारी सकाळी 8.30च्या सुमारास हा अपघात झाला. मुंबई-गोवा महामार्गावरून सोमवारी सकाळी इको कार (एमएच 06, बीई 5611) गडब ते नागोठणे अशी जात असताना ती दवंकीनगर फाटा गडब येथे थांबली होती. मागून आलेल्या डंपर (एमएच 06, एक्यू 3737)ने उभ्या असलेल्या कारला ठोकर दिली. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास उपनिरीक्षक मगर करीत आहेत.