Breaking News

नवीन वर्षात पनवेलमधील रस्ते होणार स्वच्छ आणि चकाचक!

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येणार असून आता पथदिवेही (एलईडी) चमकणार आहेत. याशिवाय महापालिका हद्दीत स्वच्छता मार्शल नेमण्यास बुधवारी (दि. 22) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व खड्डेमुक्त रस्त्यावरून चालण्याचे समाधान मिळणार आहे.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बुधवारी सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, सदस्य जगदिश गायकवाड, प्रकाश बिनेदार, निलेश बावीस्कर व इतर सदस्य तसेच उपायुक्त विठ्ठल डाके आणि अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत 6 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत स्थगित ठेवण्यात आलेल्या रस्त्यावरील निरनिराळे क्षमतेचे पथदिवे (एलईडी) दोन वर्षे पुरवठा करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. महापालिका हद्दीतील विविध ठिकाणचे रस्ते दुरूस्ती करण्याच्या खर्चासही मंजूरी दिली गेली. कंत्राटी कर्मचारी पुरवणार्‍या मे. गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली. याशिवाय पाणीपुरवठा विभागातील विद्युत पंपाची दुरूस्ती करण्यासही मंजुरी देण्यात आली.
महापालिकेकरिता कोविड-19कामी भाडेतत्त्वावर वाहने पुरवणार्‍या जे. के. टुरिस्ट आणि ट्रान्सपोर्ट कंपनीच्या झालेल्या खर्चास या वेळी मंजुरी देण्यात आली.
या वेळी प्रकाश बिनेदार यांनी या कंपनीने स्थानिकांकडून महापालिकेला पुरवण्यासाठी घेतलेल्या वाहनांचे भाडे महापालिकेकडून पैसे घेऊनही ठेकेदाराने दिले नसल्याचा आरोप केला. त्यामुळे ठेकेदाराला वाहनमालकांकडून पैसे मिळाल्याबाबत एनओसी आणल्याशिवाय कोणताही दाखला देण्यात येऊ नये व ठेकेदाराला पैसे दिले असल्याने ठराव मंजुरीसाठी  असा शब्द न वापरता अवलोकनार्थ असा शब्द वापरण्याची सूचना सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. महापालिका हद्दीत स्वच्छता मार्शल तैनात करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षात कचरा करणार्‍यांना दंड भरावा लागणार आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply