
पनवेल ः भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 100 कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण केला. याबद्दल भाजप युवा मोर्चा कामोठे मंडल आणि सुषमा पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीतून डोसचा ऐतिहासिक टप्पा अधोरेखित करण्यात आला. या वेळी नगरसेवक दिलीप पाटील, विजय चिपळेकर, डॉ. अरुणकुमार भगत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष नाना मगदूम, कैलास सरगर, आध्यात्मिक सेल संयोजक विनोद खेडकर, उत्तम जाधव, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुरेखा लांडे, कल्पना जाधव, सुरेंद्र हल्लीकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.