Breaking News

अनाथांना एक वेळचे नि:शुल्क भोजन

सहजसेवा फाऊंडेशन उपक्रमाचा खोपोलीत शुभारंभ; व्हॅलेंटाइन डे साजरा

खोपोली : प्रतिनिधी

येथील सहजसेवा फाऊंडेशन संस्थेद्वारे रोज दुपारी खास नियोजन केलेल्या फिरत्या वाहनातून अनाथांना नि:शुल्क भोजन  देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल असणार्‍या सर्व रुग्णांना 1 जानेवारीपासून दररोज सकाळी व रात्री निःशुल्क जेवण पुरवले जात आहे. फाऊंडेशनने गतवर्षी मनोरुग्णांची स्वच्छता करून व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. यावर्षी खोपोली व परिसरात ज्यांना राहण्यास निवारा नाही व जे कष्ट करून आपली उपजीविका करू शकत नाहीत, ज्यांना इतरत्र मागून पोट भरण्याशिवाय काही पर्याय नाही अशा अनाथ आबालवृद्धांसमवेत शुक्रवारी व्हॅलेंटाइन डे साजरा केला. तसेच त्यांना रोज दुपारी नि:शुल्क भोजन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यासाठी उद्योजक यशवंत लक्ष्मणशेठ साबळे, चंदूकाका जोशी व किशोर ओसवाल यांनी विशेष सहकार्य केले आहे. सहजसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, खजिनदार संतोष गायकर, उपक्रमप्रमुख किशोर ओसवाल, सहउपक्रमप्रमुख धनराज जंबगी, बंटी कांबळे, सलमान शेख, बी. निरंजन, सायली गायकवाड, अल्ताफ सय्यद, आयूब शेख, संदेश शेट्टे, रवी गौडा, अजय कांबळे, संदेश शेट्टे, आमिर पठाण, आयुब खान, रोहित ढेबे, रोहित गायकवाड, दुर्गेश देवकर, महेश मेश्राम, बंटी कांबळे, साहिल शेख, सुवर्णा मोरे, जयश्री डोंगरे, किशोर ओसवाल, निलेश जैन, राजेंद्र ओसवाल, चंदूकाका जोशी, मोहन केदार, सत्यम ओसवाल, प्रवीण वाघमारे, सलमान शेख यांच्यासह नागरिक या वेळी उपस्थित होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply