Breaking News

दहशतवाद्यांविरोधात एकत्रपणे काम करा -अमित शाह

श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौर्‍यावर आहेत. उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट 2019मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर गृहमंत्री शाह पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौर्‍यावर आहेत. गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांना शक्य तेवढ्या लवकर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यास सांगितले तसेच दहशतवाद्यांना मदत करणार्‍या कट्टरपंथीयांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करण्यास पोलिसांना सूचित केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply