Breaking News

टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारत-पाकिस्तान आमनेसामने; उत्सुकता शिगेला

दुबई ः वृत्तसंस्था

टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी (दि. 24) भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर पारंपरिक संघांमध्ये लढत रंगणार आहे. या हाय होल्टेज थराराकडे उभय देशांसह जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघाचा सुपर 12मधील हा पहिला सामना आहे. त्यामुळे सलामीचा सामना जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. वर्ल्डकपमधील इतिहास पाहता दोन्ही संघ आतापर्यंत पाच वेळा आमनेसामने आले आहेत. पाचही वेळा भारताने विजय मिळवला आहे. त्यातच या स्पर्धेतील दोन्ही सराव सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या संघांना टीम इंडियाने पराभूत केले. त्यामुळे पाकविरुद्धच्या सामन्यात भारताचे पारडे जड दिसते. दरम्यान, या सामन्यावर कोट्यवधींचा सट्टा लागल्याचे वृत्त आहे.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. राखीव खेळाडू श्रेयस अय्यर, दीपक चाहर, अक्षर पटेल.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रऊफ, हैदर अली.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply