Breaking News

पोलिसांच्या कुटुंबीयांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप

पनवेल : वार्ताहर

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होवू नये व ते सर्व सुरक्षित रहावेत या उद्देशाने कळंबोली पोलीस ठाण्यांतर्गत काम करणार्‍या अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना स्टीमर, सॅनिटायझर, मास्क, सी व्हीटॅमीन टॅबलेट आदींचे वाटप परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कळंबोली पोलीस ठाण्यामध्ये उपआयुक्त परि 2, पनवेल शिवराज पाटील, वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील आदींच्या हस्ते स्टीमर, सॅनिटायझर, एन 95 मास्क, सी व्हिटॅमिन टॅबलेटचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदार यांना फीत लावण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी कोरोनापासून स्वतः चा व कुटुंबीयांचा बचाव करण्याकरिता दक्षता घेणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चार अधिकारी, 60 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply