Breaking News

पेण-दिवा रेल्वे लवकर सुरू करा

मी पेणकर आम्ही पेणकर समितीची प्रशासनाकडे मागणी

पेण : प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल-पेण ही प्रवासी शटल रेल्वे सेवा तत्काळ सुरू व्हावी व पेण व रोहा स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी रेल्वे सेवा 11 नोव्हेंबरपूर्वी सुरू व्हावी या मागणीचे निवेदन मी पेणकर आम्ही पेणकर समितीतर्फे रेल्वे अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

पेण रेल्वेस्थानकातून पेण-पनवेल-दिवा व वसई रोड व डहाणू रोड ही प्रवासी मेमू रेल्वे सेवा पुन्हा सुरू व्हावी, तसेच पेण-दिवा ही प्रवासी रेल्वे सेवा शनिवार व रविवारी देखील उपलब्ध व्हावी. रोजच्या जलद सेमी व फास्ट, सुपर फास्ट सर्व रेल्वे गाड्यांना पेण येथे थांबा मिळावा. गणपती, दिवाळी, होळी व सुट्टी दिवशी विशेष गाड्यांना पेण व रोहा रेल्वे स्थानकात दोन मिनिटाचा थांबा मिळावा, अशा मागण्या मी पेणकर आम्ही पेणकर समितीकडून करण्यात आल्या आहेत.

रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कोविडनंतरची मेमू प्रवासी रेल्वे सेवा व प्रवासी रेल्वे सेवा तातडीने उपलब्ध करण्याचा निर्णय घ्यावा. आपले कोणतेही उत्तर न आल्यास नाईलाजाने आम्हाला सामूहिक आत्मदहनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा मी पेणकर आम्ही पेणकर समितीतर्फे देण्यात आला आहे.

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply