अलिबाग ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस जगदिश घरत, तसेच शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 23) हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष राजेश मापारा, अलिबाग तालुका सरचिटणीस संतोष पाटील आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस जगदिश घरत यांनी या पक्षाला राम राम ठोकून अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी युवा नेते समीर राणे यांनी मेहनत घेतली. तेदेखील शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांसमवेत भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे अलिबाग तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे.
Check Also
नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिटला आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट व शुभेच्छा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्तनवीन मुंबईतील यू बिझनेस मीटच्या वतीने नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट …
RamPrahar – The Panvel Daily Paper