Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खारघरमध्ये विविध कार्यक्रम

पनवेल ः प्रतिनिधी   

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत खारघरमधील हिरानंदानीजवळ पनवेल महानगरपालिका आणि केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने 25 ते 27 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवस कविसंमेलन, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, विद्युत रोषणाई, ढोल वादन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खारघरवासियांचा या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद लाभला. खारघरमधील सेक्टर 7 हिरानंदानीजवळ 25 ऑक्टोबरला रांगोळी स्पर्धा, कविसंमेलन घेण्यात आले. यामध्ये सहभागी कविंनी देशभक्तीपर कविता सादर केल्या. या कार्यक्रमास महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी उपस्थित होते. 26 ऑक्टोबरला लोकनृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये देशातील विविध राज्यांची लोकनृत्ये कथ्थक, लावणी, कुचीपुडी अशी विविध लोकनृत्ये सादर करण्यात आली, तसेच कला उत्सव या ढोल पथकाच्या वादनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये सुमारे 40 वादकांचा समावेश होता. 27 ऑक्टोबरला ’युगांत’ या बॅण्डने देशभक्तीपर गाणी तसेच इतर गाणी सादर केली. नागरिकांमधील कलागुणांना वाव देणे, त्यांच्यामधील छुपे टॅलेंट शोधणे हाही एक या कार्यक्रमाचा उद्देश होता. सर्वच स्पर्धांमध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, माजी नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमास खारघरमधील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply