पनवेल : रामप्रहर वृत्त
रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने शुक्रवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफल ‘दिवाळी पहाट’ या सुमधूर संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोनेरी पहाट आणि सुरांची सुरेल बरसात असे दिवाळी पहाटचे एक अनोखे नाते आहे. मराठी-हिंदी भावस्पर्शी गाण्यांनी दिवाळीची पहाट सुरेल करण्याची परंपरा जपायला मराठी रसिकांना आवडते. त्यामुळे दिवाळी पहाटेचा हा अनुभव पुढील अनेक दिवसांसाठी नवा उत्साह देणारा ठरतो. त्या अनुषंगाने सुश्राव्य गाण्यांची मैफल असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. दिवाळी पहाटचे हे पाचवे वर्ष आहे. दर्जेदार कार्यक्रम व उत्तम नियोजनामुळे या कार्यक्रमास रसिकांची गर्दी होत असते, त्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रवेशिका अनिवार्य असून प्रवेशिका निःशुल्क आहे. अधिक माहिती व प्रवेशिकांसाठी चिन्मय समेळ (8767149203), अभिषेक भोपी (9820702043), रोहित जगताप (8691930709), गौरव कांडपिळे (9920868008), आकाश डोंगरे (9930319832) किंवा सिद्धार्थ मोहिते (8879216669) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …