Breaking News

‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन; विजेत्यांना एकूण 45 हजारांची पारितोषिके

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सात हजार रुपये, तर द्वितीय व तृतीय अनुक्रमे पाच हजार व तीन हजार रुपये असून एकूण 30 हजार रुपयांची 20 उत्तेजनार्थ पारितोषिके असणार आहेत. एकूण विजेत्यांना 45 हजार रुपयांची पारितोषिके व आकर्षक चषकने सन्मानित करण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता नावनोंदणीची अंतिम तारीख 2 नोव्हेंबर आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रोहित जगताप (8691930709), अजिंक्य भिडे (8850644207), देवांशू प्रभाळे (8433513540), किंवा अनिकेत भोईर (9930104499) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply