नवी दिल्ली ः देशातील महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 4) वरिष्ठ अधिकार्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकार्यांना पंचसूत्री कार्यक्रम समजावून सांगितला. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोरोना नियमांचे पालन आणि लसीकरण जर गंभीरपणे आणि कटिबद्धतेने केले गेले तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. त्यासाठी अधिकार्यांनी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देशही पंतप्रधान मोदींनी या वेळी दिले.
Check Also
रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …
RamPrahar – The Panvel Daily Paper