पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल रायगडभूषण निरूपणकार डॉ. सचिन धर्माधिकारी यांना राजस्थानमधील जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापीठाच्या वतीने मानाची डि.लिट पदवी जाहीर करण्यात आली असून रविवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित समारंभात पदवी देऊन धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
डॉ. सचिन धर्माधिकारी यांना यापूर्वी फ्रान्सच्या युरोपियन इंटरनॅशनल विद्यापीठाच्या डि.लिट. पदवीसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली असून विद्यापिठाचे कुलपती डॉ. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र विद्यापिठाच्या शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी डॉ. धर्माधिकारी यांना दिले. ते गेली अनेक वर्षे रेवदंडा येथील महाराष्ट्रभूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करीत आहेत. त्यांना डि.लिट पदवी प्रदान करण्यात येणार असल्याने श्रीसदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …