नवीन पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
दिवाळी सणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात या सामानाची विक्री करण्यात येत असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचेही शुक्रवारी (दि. 29) उद्घाटन झाले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नागरिकांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे समान बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या समानामध्ये रवा, मैदा, चणाडाळ, साखर, पोहे, गुळ, डालडा आणि गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे. त्यानुसार नवीन पनवेल येथे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयात या समानाची विक्री करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका राजेश्री वावेकर, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, शिवाजी भगत, राजेश पाटील, भगवान बडगुजर, डीएस शेट्टी, रोहित घरत, माजी उपसरपंच अक्षय सिंग, जितेंद्र तिवारी, दशरथ चैउलकर, दर्शना जाधव, टीआयपीएलचे कार्यकारी संचालक धनंजय करतुरी, रिमा रावन यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, भाजपच्या वतीने प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून हा उपक्रम यशस्वी होत आहे, असा विश्वास व्यक्त केला.