Breaking News

माणगावात ज्वेलर्स दुकानातून ऐवज चोरी

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील इंदापूर येथील बालाजी ज्वेलर्सचे दुकान अज्ञात चोरट्यांने फोडून दुकानांच्या आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने सुमारे चार लाख 58 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरले. ही चोरी शुक्रवारी (दि.29) रात्री ते शनिवारी (दि. 30) सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान झाली. याबाबतची सोहनलाल बुराराम चौधरी (वय 42, रा. इंदापूर, ता. माणगाव) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

चोरट्याने चौधरी यांचे इंदापूरातील बंद ज्वेलर्स दुकानाचा लोखंडी सिलिंग लॉक व सेंटर लॉक कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने तोडून दुकानाच्या आत प्रवेश केला. त्याने दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने, सॅमसंग कंपनीचा एलसीडी टिव्ही, एक सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकुण चार लाख 58 हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरला. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक जाधव या करीत आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply