Breaking News

शेलूतील चार जणांविरोधात अॅट्रॉसिटी दाखल

कर्जत : बातमीदार

शेलू गावातील एका जागेमध्ये बांधकाम करण्यावरून झालेल्या या वादानंतर नेरळ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 15 ऑक्टोबर रोजी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या शेलू गावात घडली असून कुंडलिक नागो वाघ यांनी ही तक्रार दाखल केली.

कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळ शेलू येथील साईबाबा मंदिर आधारवाडी कातकरवाडी येथे राहणारे कुंडलिक नागो वाघ यांच्या घरासमोर असणार्‍या मोकळ्या जागेत गावात राहणारे विलास चंद्रकांत डुकरे, तुषार विलास डुकरे, जयेश डुकरे आणि बळीराम मारुती डुकरे यांनी टिकाव व फावडे घेऊन त्या जागेत बांधकाम करण्यासाठी गेले होते. या वेळी तक्रारदार कुंडलिक नागो वाघ व त्यांच्या घरातील आई आणि बहीण यांनी विचारणा केली असता डुकरे यांनी त्या वेळी कुंडलिक यांना जातीवाचक शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली, तर आई आणि बहीण पुढे गेले असता त्यांना सुद्धा डुकरे यांनी धक्काबुक्की केली. या वेळी वाद वाढू नये म्हणून कुंडलिक नागो वाघ यांनी नेरळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

या घटनेबाबत नेरळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्तरावर केला जात आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply