पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक बांधिलकी जपणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल व रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले 15वे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर 8 ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली.
खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार्या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, आयुर्वेद अशा विविध आरोग्य तपासण्यांसह औषधोपचार देण्यात येणार आहेत.
गेली 14 वर्षे आरोग्य महाशिबिर मोठ्या प्रमाणात आणि यशस्वीपणे पार पडले आहे. यंदाचे महाशिबिर यशस्वी करण्याकरिता 30 विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्या येत्या नियोजन बैठकीत कामाचा आढावा सादर करणार असल्याचेही अरुणशेठ भगत यांनी सांगितले.
Check Also
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …