Breaking News

मतदारच विरोधकांना आता घाम फोडतील

आमदार भरत गोगावले कडाडले

पोलादपूर : प्रतिनिधी

महाड विधानसभा मतदारसंघात रोजच्या रोज काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सेनेत प्रवेश करीत आहेत. पोलादपूर तालुक्यातील जनता विकासाला हपापलेली आहे. येथील मतदार विरोधकांना घाम फोडतील, असा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी लोहारे येथे व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्या प्रचारासाठी पोलादपूर तालुक्यातील लोहारे पंचायत समिती गणात जाहीर सभा घेण्यात आली. त्यात आमदार गोगावले बोलत होते. राजिपचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, पं. स. सदस्य यशवंत कासार, सेनेचे संपर्कप्रमुख किशोर जाधव, माजी संपर्कप्रमुख सुभाष पवार, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, उपतालुकाप्रमुख शौकत तारलेकर, लक्ष्मण मोरे आदींची या वेळी भाषणे झाली. भाजपचे पोलादपूर तालुकाध्यक्ष तुकाराम केसरकर, सुरेंद्र चव्हाण, संदेश कदम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांनी केला पक्षप्रवेश

पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र फुलसुंदर यांनी या वेळी स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला. कालवली येथील धोंडीराम पार्टे, वझरवाडी येथील दत्ताराम चव्हाण, सीताराम चव्हाण, संभाजी चव्हाण, शिवाजी चव्हाण, आत्माराम जाधव, तानाजी जाधव, संदीप शिंदे, अर्जुन जाधव, चंद्रकांत पवार, गणपत जाधव, दगडू जाधव पवार, हरिश्चंद्र जाधव, राम जाधव, चंद्रकांत पवार, पांडुरंग पवार, बबन शिंदे, प्रवीण पवार, लोहारे पवारवाडी येथील दिनकर पवार, गोविंद पवार, नामदेव पवार, रमेश पवार, शांताराम पवार, गणपत पवार, संगीता पवार, विठाबाई पवार, ज्योती पवार, द्रौपदी पवार आदींनी या वेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला, तर महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ पिंपरी-चिंचवड विभागाच्या पदाधिकार्‍यांनी आ. गोगावले यांना या वेळी लेखी पाठिंबा दिला.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply