पेण ः प्रतिनिधी
मध्य प्रदेशातील खंडवा येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय एल्बो-बॉक्सिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पेण येथील आराध्य अजित साळवी याने उत्कृष्ट कामगिरी करीत महाराष्ट्राला सुवर्णपदक पटकावून दिले.
महाराष्ट्र एल्बो-बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र बॉक्सिंगची टीम राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली होती. यामध्ये पेण गणपती वाडीत राहात असलेल्या आराध्य साळवी याने सुवर्णपदक जिंकले. आराध्य हा रवींद्र म्हात्रे यांच्याकडे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. तो आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य अजित साळवी यांचा मुलगा असून, आई अरुणा साळवी या परिचारिका म्हणून काम करतात.
आराध्य याच्या यशाचे रायगड जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन केले, तसेच आराध्यच्या गावातील नागरिकांनीही त्याचे कौतुक केले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …