Breaking News

मल्हार रोजगार मेळाव्यास उदंड प्रतिसाद

तब्बल 691 जणांना मिळाली नोकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मल्हार रोजगार, तसेच आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, डी. डी. विसपुते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा पहिला भव्य रोजगार मेळावा शनिवारी (दि. 22) आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तब्बल 691 जणांना ऑन दि स्पॉट नोकरी मिळाली.
देवद येथील डी. डी. विसपुते कॉलेजमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष महेंद्र विसपुते, चेअरमन धनराज विसपुते, विश्वस्त विजय सोनार, वंदना सोनार, जि. प. सदस्य अमित जाधव, माजी सदस्य राजेंद्र पाटील, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष वाघमारे, दिनेश वाघमारे, वासुदेव वाघमारे, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, हरिश्चंद्र वाघमारे, संजय पाटील, सचिन वाघमारे, देवद अध्यक्ष जगदिश वाघमारे, संदीप वाघमारे, राजू मोकल, मिलिंद पाटील, माजी उपसरपंच विनोद वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याचा 2182 जणांनी लाभ घेतला. 40 कंपन्यांच्या माध्यमातून 691 जणांना नोकर्‍या उपलब्ध करून देण्यात आल्या, तर 378 जणांची पुनर्मुलाखतीसाठी निवड झाली आहे. मेळावा यशस्वी करण्यासाठी सागर माने, आनंद चव्हाण, विशाल ठोकळ, श्रुती गायकवाड, अवनी सुळे, तसेच आदर्श समूहाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply