पनवेल : वार्ताहर
अहमदनगरमधील सुपा येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र कॅडेट आणि जुनिअर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलमधील खेळाडूंनी सुयश प्राप्त केलेे आहे. या स्पर्धेत 33 जिल्ह्यांतील सुमारे 930 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यात पनवेल शहराचा संघ अध्यक्ष जयेश चोगले व सचिव दिक्षा जैन यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाला होता. या 26 खेळाडूंनी म्युसिकल फॉर्म, पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, प्रो फाईट अशा सर्व प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत स्वत:सह पनवेलचे नाव उंचावले आहे. विविध प्रकारांमध्ये मयूरी पिसे हिने सुवर्ण व रौप्य, आदित्य खंडिजोड सुवर्ण व कांस्य, अस्मि गुरव, ऋग्वेद जेधे, शार्दूल सावंत, अथर्व कविणकर यांनी सुवर्ण, ओम कोकणे रौप्य व कांस्य, सायली शेडगे, अंजली पटणे, वेध शेळके यांनी रौप्य; तर समृद्धी तांगडे, भाविक भंडारी, दीप म्हात्रे, गोवर्धन पुजारी, आदर्श चव्हाण, वेदांत चव्हाण यांनी कांस्यपदक पटकाविले. यशस्वी खेळाडूंना मास्टर राजू कोळी, संघ व्यवस्थापक केदार खांबे, प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड, वैष्णवी कोंढाळकर, पंच संतोष मोकल, धनेश शिंगोटे, मंदार चावळकर, महेंद्र कोळी, राजेश कोळी, गोपाळ म्हात्रे यांचे मार्गदर्शल लाभले. विजयी खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.