Breaking News

खालापूरमध्ये जर्नालिस्टची असोसिएशनची स्थापना

अध्यक्षपदी अरुण नलावडे, तर उपाध्यक्षपदी जयवंत माडपे

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुका व खोपोली शहर येथील असंघटीत पत्रकारांनी मंगळवारी (दि. 2) एकत्र येत खालापूर जर्नालिस्ट असोसिएशनची स्थापना केली. या संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण नलावडे तर उपाध्यक्षपदी जयवंत माडपे यांची निवड करण्यात आली.

खालापूर तालुक्यातील असंघटीत पत्रकारांची बैठक मंगळवारी ताकई येथील एन. पी. ढाबा येथे झाली. या वेळी खालापूर जर्नालिस्ट असोसिएशनची स्थापना व पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. त्यात अरुण नलावडे (अध्यक्ष), जयवंत माडपे (उपाध्यक्ष), हनुमंत मोरे (सचिव) आणि दत्ता शेडगे (खजिनदार) यांचा समावेश आहे. नितीन भावे, अनिल वाघमारे, अंकुश मोरे, संदीप ओव्हाळ, प्रसाद अटक, सारिका सावंत, विकी भालेराव, अर्जुन कदम, संतोष गोतरणे व महबूब जमादार यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply