पनवेल : रामप्रहर वृत्त
मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला चांगली कमागिरी करत नाव कमवायचे आहे, असे प्रतिपदान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोड येथे टर्फ कोर्टच्या उद्घाटनावेळी केले. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये फुटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या कोर्टचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (दि. 4) झाले.
उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्समध्ये आंररराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवून देणारे खेळाडू निर्माण होत आहेत. त्याअंतर्गत स्पोर्ट्स कॉम्ल्पेक्सच्या सुविधांमध्ये आणखी भर पडली असून, फूटबॉल खेळाडूंसाठी टर्फ कोर्टचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे फुटबॉल खेळाडूंना आपल्या कलाकौशल्यात आणखी सुधारणा करता येणार आहे. या कोर्टचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी झाले. या वेळी व्यवस्थापक समिती सदस्य रवींद्र भगत, स्वप्नील ठाकूर, शिवशंकर सुमन, सहाय्यक व्यवस्थापक श्यामनाथ फुंडे, प्रणीत गोंधळी, स्पोर्ट्स सुपरवायझर लोकेश शेट्टीगार, फुटबॉल कोच करतार सिंग अरोरा, अमोघ ठाकूर, आदित्य ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदेश ठाकूर आदींसह खेळाडू उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक खेळाडूला समान संधी दिली जाते. त्यामुळे आपण चांगले काम करत नाव मिळवण्यासाठी प्रयत्न करा. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक खेळाडूला कोणताही भेदभाव न करता समान संधी दिली जात असल्याने खेळाडूंच्या कलागुणांना आणखी वाव मिळत असून ते चागंली कामगिरी करत आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला 10 वर्षे पूर्ण होतील त्या वेळी आपल्याला नामवंत म्हणून नाव लौकिक मिळेल व 25व्या वर्षी आपण राष्ट्रीय विजेतेपदाचे दावेदार असू, असा विश्वास व्यक्त केला.