पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीधर फडके यांचा ’दिवाळी संध्या’ अर्थात गीतगायनाचा सुश्राव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी 6.30 वाजता शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.
दिवाळी संध्या कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. प्रवेशिका व अधिक माहितीसाठी श्यामनाथ पुंडे (9821758147), चिन्मय समेळ (8767149203), अभिषेक पटवर्धन (9029580343), अमोल खेर (9820233349) किंवा गणेश जगताप (9870116964) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.