Breaking News

नगरसेवक राजू सोनींची तत्परता

अनेकांना शॉक लागण्याचा अनर्थ टळला

पनवेल : वार्ताहर

विद्युत पुरवठा करणार्‍या वाहिनीच्या खांबाला हाय टेंशनमुळे वीज प्रवाह त्यातून वाहत होता. धोकादायक खांबाची बाब नगरसेवक राजू सोनी यांना समजताच त्यांनी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर धाव घेतली. त्यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांना घटनास्थळी बोलावून घेऊन प्रथम विद्युत पुरवठा खंडीत केल्याने अनेकांचे प्राण बचावले आहेत.

शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रसमोर असलेल्या व्यंकटेश मेडिकल येथील मालक अरूण मालपाणी व जे. पी. शर्मा यांनी या विजेच्या खांबाला करंट लागत असल्याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळवताच ते तत्परेतेने त्याठिकाणी आले. त्यांनी तातडीने वीज वितरण कंपनीचे अधिकारी चौधरी यांना याबाबत माहिती दिली. त्वरीत त्याठिकाणी वायरमॅन अमर पाटील व जाधव आले. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी प्रीतम पाटील हेसुद्धा आपली यंत्रणा घेऊन तसेच जागरूक नागरिक उमेश जगनाडे तेथे पोचले. अधिक तपासणीत या पोलला हाय टेंशन वायरचा करंट लागत होता. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने निष्काळजीपणे त्या खांबाला कोणी जरी नुसता हात लावला असता तरी चिटकला असता. पोलवर चढून संबंधित कर्मचार्‍यांनी ती समस्या निकामी केली व खंडीत केलेला विद्युत पुरवठा चालू केला.

त्याचप्रमाणे परिसर काळोखात असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याकडे या परिसराकरीता दोन हाय मास दिवे उभारण्याची मागणी केली. या मागणीला दुजोरा देत याबाबतचा पत्र व्यवहार पनवेल नगरपालिकेशी तत्परतेने करून मंजूरी मिळताच त्वरीत दोन ठिकाणी हाय मास बसविण्याचे त्यांनी आश्वासन दिले. नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने दुर्घटना टळल्याबद्दल परिसरातील नागरिक व व्यापार्‍यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply