Thursday , March 23 2023
Breaking News

दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त  – भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि पनवेल तहसील महसूल विभाग यांच्या वतीने मोफत सरकारी दाखले वाटप शिबिर शुक्रवारी (दि. 5) श्री कृपा हॉलमध्ये घेण्यात आले. या उपक्रमास प्रतिसाद लाभला.

परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना सरकारी दाखले मिळवण्यासाठी होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता खांदा कॉलनी येथे नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या मागणीनुसार आणि भाजप खांदा कॉलनी व पनवेल तहसील महसूल विभाग यांच्या वतीने मोफत सरकारी दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम म्हात्रे, भाजप नेते भीमराव पोवार, मोतीराम कोळी, गोपीनाथ मुंडे, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दाखले वाटप शिबिराचा परिसरातील अनेक नागरिक व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply