Breaking News

नागोठणे वनखात्याकडून बांधकामावर कारवाई

नागोठणे : प्रतिनिधी

जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वनविभागाकडून गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून, वनखात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांच्या विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येथील नारायण सॉ मिल रस्त्यालगत वनखात्याचा डेपो आहे. येथील वन विभागाचे मुख्य अधिकारी के. डी. ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र शासनाने सर्व्हे नंबर 114/1, 114/2, 115/1, 115/2 अ, 115/2ब, 115/3, 115/4, 128/0, 129, 130/2, 130/6 एवढी जागा वेगवेगळ्या मालकांकडून 1963 साली खरेदी केली होती व त्याचे पैसे मूळ मालकांना दिल्यानंतर 17 मार्च 1967 रोजी भूसंपादन करण्याबाबतचा आदेश, अवॉर्डद्वारे निर्गमित करण्यात आला होता, असे स्पष्ट केले. हवाबी गोलंदाज यांचे येथे जुने घर असून त्यांनी या ठिकाणी वाढीव बांधकाम केले असल्याने वनखात्याकडून त्यांना मंगळवार दि. 14 मे रोजी नोटीस पाठवून सदरील सर्व्हे नंबरचे प्रकरण अलिबाग न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने काम थांबविण्यास सांगितले होते. 14 तारखेला नोटीस बजावल्यानंतर दोनच दिवसांत म्हणजे 16 तारखेला वनखात्याने फौजफाट्यासह तेथे येऊन बांधकाम तोडले असल्याने माझ्यावर एकप्रकारे अन्यायच झाला असल्याचे श्रीमती गोलंदाज यांचे म्हणणे आहे. वनखात्याची जर ही जागा आहे असे जर त्यांचे म्हणणे असेल, तर त्यांनी 1967 साली जागा ताब्यात घेतल्यावर चुकीची सीमा का आखली, असा गोलंदाज यांचा सवाल आहे. माझे बांधकाम पाडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे व त्या विरोधात न्याय मागणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. वनाधिकारी ठाकूर यांनी संबंधित जागांचा सर्व्हे नंबर आजही जुन्या व्यक्तींच्या नावावरच आहे, असे संबंधित प्रतिनिधीजवळ मान्य केले, मात्र आमच्या कार्यालयाकडून वनखात्याच्या नावावर संबंधित जागेचा सर्व्हे नंबर होण्यासाठी वेळोवेळी महसूल कार्यालयाचे लक्ष वेधले असून त्यांच्याकडून सहकार्य केले जात नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply