Breaking News

वाकण-खोपोली राज्य महामार्ग जमीन अधिग्रहण; बाधित शेतकर्‍यांची उच्च न्यायालयात धाव, जनहित याचिका दाखल

पाली : प्रतिनिधी

वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गासाठी करण्यात आलेल्या जमीन अधिग्रहणाबाबत बाधित शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका (21600/2021) दाखल केली आहे. भूसंपादन प्रक्रियेत बाधित शेतकर्‍यांना योग्य तो मोबदला व जलद नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग बेकायदा जमीन अधिग्रहण संदर्भात बाधित शेतकरी सचिन गजानन तेलंगे, पांडुरंग लिंबाजी तेलंगे, गिरीश सीताराम काटकर यांनी वकील आर. एन. कच्छवे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी व  सुधागड तहसीलदार तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply