पनवेल : रामप्रहर वृत्त
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ज्या महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्या महिलांनी केलेले कार्य हे इतरांना स्फूर्ती देणारे असल्याचे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि.11) केले. ते यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्यात बोलत होते.
स्व. यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, कामगार, राजकीय, कला, क्रीडा आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या महिलांच्या सन्मानार्थ यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते. या वेळी त्यांनी महेंद्र घरत यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. जबाबदारी टाकली की ती पार पाडण्याचे काम करतो, अशा शब्दांत त्यांचे कौतुक करीत शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीला 10 लाख रुपयांची अर्थिक मदत जाहीर केली.
या समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, उद्योजक जे.एम.म्हात्रे, डॉ. गिरीश गुणे, रघुनाथ घरत, अॅड. प्रमोद ठाकूर, उद्योजक जमीर शेख, गुलाबशेठ घरत, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अतुल पाटील, बबन पाटील, किशोर पाटील, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, जयवंत देशमुख, शरद खारकर, श्रीकांत घरत, शुभांगी घरत, कुणाल घरत, मयुरेश चौधरी, सोनाली घरत-चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
या वेळी समाजसेवा क्षेत्रात भारती भैरू पवार, औद्योगिक क्षेत्रात जयश्री काटकर, महिला वैमानिक प्राप्ती ठाकूर, अविरत सेवा मनीषा अतुल पाटील, राजश्री बाळाराम पाटील, शैक्षणिक क्षेत्रात जोत्स्ना सुधीर ठाकूर, बँकिंग सोनल यशोधन पाटील, सिडको प्रशासन क्षेत्रात प्रिया उत्तम रातांबे, राजकीय धुतूमच्या सरपंच सुचित्रा प्रेमनाथ ठाकूर, म्हातवलीच्या सरपंच रंजना चारुदत्त पाटील, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात तरन्नुम कामजी, शैक्षणिक क्षेत्रात श्रृष्टी राजेंद्र मुंबईकर आणि विशेष सन्मान म्हणून उद्योजिका सोनाली मयुरेश घरत-चौधरी यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार लोकनेते रामशेठ ठाकूर व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात यमुना सामजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीला पाच लाख, सिटीझन एज्युकेशन सोसायटीला एक लाख 51 हजार, रयत शिक्षण संस्थेला एक लाख, ग्राम स्वराज्य समितीला 51 हजार, किरीट पाटील यांना उरण गणेश नगरमध्ये बंगला, लक्ष्मण जडर यांना कर्जत कासेवाडी येथे घर, आनंद ठाकूर यांना उलवे रिद्धीसिद्धी हाईटमध्ये 2 बीएचके फ्लॅट, लक्ष्मण ठाकूर यांना फोटो स्टुडीओ आणि रिद्धीसिद्धी हाईटमध्ये 1 बीएचके फ्लॅटचे हस्तांतरण करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …