खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची पडझड थांबायचे नाव घेत नसून 31 जानेवारीला चौक जिल्हा परिषद विभागातून चौक, बोरगाव ग्रामपंचायत सरपंचांसह हजारो कार्यकर्ते ‘शिवबंधन’ तोडून ‘कमळ’ हाती घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे.
उद्धव ठाकरे गटाचे चौक जिल्हा परिषद विभागप्रमुख सुधीर ठोंबरे यांच्या भाजप प्रवेशानंतर चौक भागात शिवसेनेत गळती सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी लोधिवली गावातून सुमारे तिनशे कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा 31 जानेवारीला सुधीर ठोंबरे शक्तिप्रदर्शन करणार असून चौक ग्रामपंचायत सरपंच रितु ठोंबरे, बोरगाव ग्रामपंचायत सरपंच प्रितेश मोरे, माजी सरपंच प्रवीण मोरे, अनेक ग्रामपंचायत सदस्य, शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Check Also
कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …