तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी (दि. 9) आसुडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली.
आसुडगाव येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी 10 ते दुपारी 2 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 90 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच 34 नागरिकांना मोतीबिंदू शास्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर शंकरा आय हॉस्पिटलमध्ये मोफत शास्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिराला पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका चंद्रकला शेळके, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, सचिन भुमकर, प्रकाश पाटील, भाजप नेते शशिकांत शेळके, शंकुनाथ भोईर, सचिन गायकवाड, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. पी. पाटील आदी उपस्थित होते.
डोळ्याचा त्रास हा कोणत्याही वयामध्ये सुरू होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना होणार्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत उपचार करुन घ्यावा, असे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी या वेळी सांगितले.