Breaking News

श्री काळभैरवनाथ यांचा जन्मोत्सव साजरा

पोलादपूर : प्रतिनिधी

श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या वतीने मंगळवारी पोलादपूर नगरीचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री काळभैरवनाथांचे दर्शन आणि तीर्थप्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती.ग्रामदेवतांच्या देवस्थानामध्ये श्री काळभैरवनाथ, श्रीदेवी जोगेश्वरी, श्रीदेव रवळनाथ, श्री कालिकामाता, श्री मरीआई असे पंचायतन आहे. देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव महाडिक यांनी मंगळवारी सकाळी ग्रामदैवतांचा अभिषेक केल्यानंतर तांबडभुवन येथील जयेश जगताप यांनी सपत्नीक श्री सत्यनारायणाची महापूजा केली. भैरवनाथनगर महिला मंडळाचे भजन झाले. सायं. महाआरती व रात्री आदिशक्ती महिला भजन मंडळाचे सुश्राव्य भजन झाले. ग्रामदेवतांवर फुलांची उधळण करण्यात आली. मध्यरात्रीनंतर महाआरती होऊन दिवसभराच्या उत्सवाची सांगता करण्यात आली.

Check Also

उलवे नोड सी-फूड फेस्टिव्हलचे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तराज्यातील मत्स्य व्यवसायामध्ये मोठी क्षमता असून त्यासाठी बजेट वाढवून विकासाला गती …

Leave a Reply