Breaking News

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा

अलिबाग ः प्रतिनिधी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या हस्ते  अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले होते. रखडलेल्या रस्त्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शिवसेनेचे अलिबा-मुरूड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनीही या रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले.या वेळी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा दक्षिण उपाध्यक्ष दिलीप भोईर, अलिबाग तालुका भारतीय जनता युवा नेते वरडे सरपंच सुधीर चेरकर, ओबीसी सेल अध्यक्ष अशोक वारगे, रामराज विभाग प्रमुख अजिंक्य पाटील, आप्पा पालकर इतर पदाधिकारी उपस्थित होते. अलिबाग-मांडवा रस्त्याचे काम ज्यांनी केले आहे, त्यांनाच या रस्त्याचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा चांगला असेल, असा विश्वास दिलीप भोईर यांनी व्यक्त केला.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply