Breaking News

पाकच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत

नवी मुंबई : प्रतिनिधी

पाकिस्तान-ओखा (गुजरात) सागरी सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून गुजरात राज्याच्या पोरबंदर जिल्ह्यातील जलपरी या मासेमारी नौकेवर गोळीबार करण्यात आला होता. त्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे हा तरुण मच्छीमाराचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना गुरुवारी (दि. 11) कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार रमेश पाटील यांच्या वतीने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. त्याचा धनादेश भाजप मच्छीमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अ‍ॅड. चेतन रमेश पाटील यांनी चामरे कुटुंबीयांना सुपूर्द केला.    

राज्याचे मुख्यमंत्री व मत्स्यव्यवसाय मंत्री यांना मृत मच्छीमार बांधवांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने तत्काळ मदत देण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याचे पाटील यांना सांगितले. हा हल्ला गुजरात राज्याच्या हद्दीमध्ये झाला असल्याने गुजरात राज्याकडूनही या कुटुंबाला मदत मिळण्याकरिता आम्ही विनंती करणार आहोत. केंद्र सरकारकडे सुद्धा आम्ही मृत मच्छीमार बांधवांच्या लहान मुलांच्या व कुटुंबाच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे अ‍ॅड. चेतन पाटील यांनी सांगितले.   

या वेळी जिल्हाध्यक्ष अशोक हंबीरे, भाजप नेते विजय तामोरे, जिल्हा सचिव प्रमोद आरेकर, पश्चिम मंडळ अध्यक्ष भुषण पाटील, भाजप जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर पाटील, सचिन पागधरे, धनंजय मेहेर, तन्मय साखरे, पंकज मेहेर, नंदिनी चामरे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply