Breaking News

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्माला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. कानपूर येथे होणार्‍या पहिल्या कसोटीत रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे, तर मुंबईत होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात विराट कोहली संघाची कमान सांभाळेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रिषभ पंत यांना न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा 28 वर्षीय भरत आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता. न्यूझीलंड संघ टी-20 वर्ल्डकप संपल्यानंतर थेट भारत दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटीसोबत तीन टी-20 सामन्यांचेही आयोजन करण्यात आले आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी 20 सामने होतील.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), के. एल. राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने : पहिला कसोटी सामना-25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर

दुसरा कसोटी सामना-3 ते 7 डिसेंबर, मुंबई

  नवीन प्रशिक्षक कमान सांभाळणार?

या दौर्‍यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) नवीन कोचिंग स्टाफची घोषणा करू शकते. विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक, टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हाम्ब्रे गोलंदाजी प्रशिक्षक असतील. सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक राठोड त्यांच्या पदावर कायम राहू शकतात, तर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करेल.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply